गोंडपिपरी :- मकरसंक्रांतीनिमित्य प्रेरणा महिला बचत गट,गोंडपिपरीच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रथमतः गटातील जेष्ठ सदस्यांच्या हस्ते पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला माल्यार्पण तथा अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रेरणा महिला बचत गटातील सर्व सदस्यांनी एकमेकींना हळदीकुंकू लावत आदरसत्कार करून सौभाग्याचे देणं म्हणून एकमेकांना वाण स्वरूपात भेट वस्तू देण्यात आले.
याप्रसंगी बचतगटातील सर्व महिलांनी विविध खेळ,उखाणे,नृत्य करीत हळदीकुंकू कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
शेवटी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.प्रितीताई जिडकुंटवार,अध्यक्ष, सौ.मानसा समेटा, उपाध्यक्ष, सौ.रेणू अम्मावार,सचिव,सौ.नरसाताई घर्षकुर्तीवार,सौ.लक्ष्मीताई घर्षकुर्तीवार,
सौ.ममताताई विरुटकर,
सौ.गोपिकाताई कोरडे सौ.माधुरीताई झाडे,सौ.आशाताई गायकवाड,सौ.वैजंतीताई कातर कर,सौ.रामेश्वरीताई मोरे सौ.अनिताताई अम्मावार,सौ.श्रीलताताई घर्षकुर्तीवार,वैशालीताई पुद्दटवार कु.साक्षी गायकवाड,सलोनी अम्मावार,अक्षरा समेटा यांनी उत्कृष्ठ नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.