वर्तमानपत्र हे समाजाचा दर्पण व्हावा हाच उद्देश असावा... सुधिर मुनगंटीवार



बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्र सुरू करताना जी भावना उद्दिष्ट घेऊन वृत्तपत्र सुरू केले त्या वर्तमानपत्राचे नाव दर्पण होते याचा अर्थ वर्तमानपत्र हे समाजाच्या दर्पण व्हावा हा त्यांचा उद्दिष्ट होता, बॅचलर ऑफ जर्नालिझम bachelor of generalism करीत असताना एखाद्या विषयात जर विद्यार्थी नापास झाला तर इतर विषयांमध्ये पास झाला तरीही त्याला पुन्हा पूर्ण विषयांची परीक्षा द्यावे लागत होते. यामुळे हा भेदभाव का होतो असा उत्सुकतेपोटी जेव्हा हेड ऑफ डिपार्टमेंटला head of department विचारले तेव्हा त्यांनी अतिशय छान उत्तर दिले ते म्हणाले की,एखादा इंजिनियर चुकला तर संपूर्ण फुल कोसळून पडेल पण एखादा पत्रकार चुकला तर समाज बिघडेल आपण जे लिहितो ते लोकांना खरं वाटतं परंतु बातमी लिहिताना माहिती तपासून योग्य पद्धतीने पारख करून त्याची माहिती समाज माध्यमांना द्या, चाणक्य बाबतीमध्ये कधी कधी अडचण येते, कारण एवढी स्पर्धा आहे की या स्पर्धेमध्ये एका मिनिटात बातमी पोहोचली पाहिजे, यावेळी कधी कधी "राईचा पर्वत नव्हे तर राईच्या फोटोचाही पर्वत होणे "ही शक्यता नकारता येत नाही, आपल्याला वाटतं की जग बदलायचे असेल तर दुसऱ्यांनी बदलायची असते पण बिघडवायचे काम तर मी करत आहे ही भावना अनेकदा असते, एका शायरने एक वाक्य वापरलेला आहे "अगर आप दुनिया को बदलने वालो की धुंड रहे , तो एक बार अपने आपको दर्पण मे देख लो दुनिया बदलने वाला दिख जायेगा!" दर्पण करांच्या या पत्रकार दिनानिमित्ताने ही जबाबदारी आपणावर आहे आपल्याला आपल्या लेखणीतून फक्त प्रश्न जन्माला घालायचे नाही किंवा सांग कामाची भूमिका घ्यायची नाही, पत्रकारितेत आपले उद्दिष्ट फक्त समाज परिवर्तनाचा आहे समाजामध्ये आपल्याला या देशाला अभिमान वाटावा असा नागरिकांचा समूह निर्माण करणे हा समूह निर्माण करताना जो जो अडचणी आणेल त्याला अडवा आणि त्या दृष्टिकोनातून पत्रकार क्षेत्रात काम कराल असे व्यक्तव्य माननीय नामदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार Sudhir Mungantiwarमंत्री वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय व पालकमंत्री चंद्रपूर यांनी चंद्रपूर गडचिरोली संपादक पत्रकार संघाच्या आयोजित पत्रकार दिन व सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलत होते.


चंद्रपूर गडचिरोली संपादक पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राच्या मराठी पत्रकार दिन म्हणून डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख वक्ते म्हणून राज्याचे वन व मत्स्य, सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश अलोणे संस्थापक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ, ,मा.रविंद्रसिंग परदेशी पोलीस अधीक्षक चंद्रपूर,मा.देवराव भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा, मा.अनंत भास्करवार सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, संजय वैरागडे, महाव्यवस्थापक वेकोली,सुनिल पाटील अध्यक्ष संघर्ष समिती चंद्रपूर,नामदेव डाहुले, यांची प्रामुख्याने उपस्थित होती.यावेळी सुधिर मुनगंटीवार यांच्या हस्ते अनेक सत्कार मुर्तीचा सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाचे आयोजन संजय कन्नावार संपादक सा. चंद्रपूर क्रांती, कुमार जुनमलवार संपादक सा. कुमार दर्पण, डि. एस. ख्वाजा जिला प्रतिनिधी विदर्भ प्रिन्ट,रकीब शेख संपादक सा. कोलसिटी खबर यांनी केले.प्रास्तावीक संजय कन्नावार यांनी तर आभार प्रदर्शन रकिब शेख यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते.