▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

नक्षलवादी महाकाली मंदीरात घुसलेचंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या महाकाली मंदिरात अतिरेकी शिरुन बाॅम्ब ठेवल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने परीसरात व चंद्रपूर करामध्ये धडकी भरली होती.यावेळी चंद्रपूर पोलीस, अतिरेकी विरोधी दल, सी 60 दलाच्या जवान,बाॅम्ब पथकाने मंदिर परिसरात धाव घेतली.

सुरक्षा दलांनी तत्काळ संपुर्ण परिसर ताब्यात घेऊन संपुर्ण भागाची काटेकोरपणे तपासणी करून तीन अतिरेक्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून बॉम्ब हस्तगत करण्यात आला. सदर बॉम्ब त्याच परिसरात निकामी करून सुरक्षा दलाने तिनही अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्याचे कळताच चंद्रपूर वासियांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले व शहरात विविध अफवांचे पेव फुटले, मात्र काही वेळातच ते खरे अतिरेकी नव्हते तर तो पोलीस व इतर सुरक्षा दलाची नियमित सराव होता. अशा प्रकारच्या माकमॉक ड्रिल करून सुरक्षा दलाला सज्ज ठेवल्या जाते तसेच कुठेही असा प्रसंग ओढवला तर नागरिकांना सुरक्षित ठेऊन संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास करण्यात येत असल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे असुन कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.