धनगर आरक्षण सुनावणी १६ फेब्रुवारीला Dhangar reservation hearing on February 16धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचेScheduled Tribes to Dhangar community आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीला घेऊन अनेक धनगर नेत्यांनी वेगवेगळ्या याचीका मुंबई उच्च न्यायालयातbombay High court सादर केला होता,त्याचीच सुनावणी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असल्याने यावर कोणता निर्णय दिला जातो याकडे धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या Scheduled Tribes to Dhangar community यादीत समाविष्ट केला आहे.मात्र राज्यकर्त्यांनी "र"चा "ड" करीत धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे धनगर समाज विकासापासून कोसो दूर राहीला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी अनेक नेत्यांनी आंदोलन मोर्चे काढले.मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष करीत आश्वासने देत फक्त मतपेटीचा वापर केला.अनुसूचित जमातीच्या उमेदवारांप्रमाणे शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्यावे अशी याचीका मुंबई उच्च न्यायालयात Bombay High court अहील्यादेवी प्रबोधन मंच,हेमंत पाटील व इतरांनी यांनी दाखल केली होती.त्या याचीकेवर वनवासी कल्याण आश्रमाने विरोधात याचिका दाखल केली आहे.या याचीका दाखल करताना न्यायालयाने स्वतंत्र याचीका दाखल करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार याचीका दाखल झाले आहे.त्या सर्व याचीकावर १६ फेब्रुवारी पासून अंतीम सुनावणी होईल.त्यावर उच्च न्यायालय कोणता निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.