गुजरात gujrat राज्यातील निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष rastriya samaj party मोठ्या आवाहाना समोर उभी असून ताकदीने लढा देत त्याच धर्तीवर आता विदर्भातही पक्षाला ताकदीने उभी करण्याचा प्रयत्न असून सध्या विदर्भातील सर्व जिल्हाभर पक्षाचा प्रचार करण्यात येतअसून राष्ट्रनायक मा. आ. महादेव जानकर Mahadev jankar यांच्या संकल्पनेतून रासप ही राज्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे.छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू , आंबेडकर विचार धारेवर चालणारा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. आदरणीय कांशीराम साहेबांच्या Kanshiram विचारांशी सहमत आहे.त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष जोमाने वाढविण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे असे जाहीर आवाहनही प्रा. ॲड रमेश पिसे रासप विदर्भ अध्यक्ष तथा प्रभारी रामटेक लोकसभा यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा चंद्रपूर येथील वसंत भवन येथे आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा प्रभारी गडचिरोली जिल्हा, कृषी सम्राट राजेंद्र पाटील,विदर्भ महासचिव संजय कन्नावार नागपूर जिल्हा उपाध्यक्ष ,दत्ताजी मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अनिकेत अनिल चामाटे यांची युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी यवतमाळ या पदावर,अनुप चंद्रपाल यादव यांची वाहतूक आघाडी विदर्भ महासचिव पदावर, साईनाथ नारायण येवले यांची बल्लारपूर तालुका प्रभारी अध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात आले.तर गडचिरोलीचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी मुखरू ओगेवर साहेब यांची नियुक्ती करण्यात आली. तर गडचिरोली तालुका युवा अध्यक्ष पदी संदीप काळेवार . याची नियुक्ती करण्यात आली.
नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे दि.२१/१२/२०२२ रोजी राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांच्या उपस्थितीत सोशल मीडिया,पक्षाचे कार्य करीत असतांना पदाधिकाऱ्यांनी उत्पन्नात लाढ कशी करावी यासाठी विविध बॅकेच्या माध्यमातून संबोधन करण्यात येणार आहे.तसेच महादेव जानकर साहेब यांचे मार्गदर्शन सुध्दा लाभणार असल्याने जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी बहुसंख्येने पदाधिकाऱी कार्यकर्ते उपस्थित होते.