नागपूर:- राष्ट्रीय समाज पक्षाचे जेष्ठ नेते विदर्भ संघटक हरिकिशन (दादा )हटवार साहेब यांचेअध्यक्षतेत आज शनिवार दिनांक 03 डिसेंबर 22 रोजीला दुपारी 3:00 वा विदर्भातील रासपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विदर्भस्तरीय आढावा बैठक ." रासप विदर्भ जनसंपर्क कार्यालय, म्हाळगी नगर चौक, रिंग रोड, H. P.पेट्रोल पंप समोर, नागपूर येथे आयोजित केली आहे. तरी या आढावा बैठकीला रासप कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विदर्भ अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे यांनी केले आहे.
या बैठकीत हिवाळी अधिवेशन दरम्यान विदर्भस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर, सोशल मिडिया प्रमुख कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यास नियुक्ती पत्र देवून जबाबदारी निश्चित केली जाईल. त्याच प्रमाणे विदर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी बाबत रासपचीrsp रणनीती ठरवण्यात येणार असून त्याअनुषंगाने पक्ष बांधणी मजबूत करण्यात येणार असून सक्रिय सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवून गांव तिथे शाखा." हर हर महादेव ! घर घर महादेव "अभियान राबविणार असेही प्रा. ऍड रमेश पिसे म्हणाले. रासप कार्यकर्ता आर्थिक दृष्टया सक्षम होण्याकरिता स्वयंरोजगार /उद्योग व्यवसाय मागदर्शन शिबीर राबविण्याबाबत निर्णय घ्येण्यात येणार आहे.
या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी कृषी सम्राट राजेंद्र पाटील, विदर्भ अध्यक्ष तथा रामटेक लोकसभा प्रभारी प्रा. ऍड. रमेश पिसे,मुख्य महासचिव संजय कन्नावार, नागपूर लोकसभा प्रभारी तथा शहर अध्यक्ष डॉ. अनंत नासनूरकर, विदर्भ संघटक जेष्ठ नेते हरिकिशन (दादा) हटवार, लक्ष्मण रोकडे, विधी आघाडीचे विदर्भ अध्यक्ष ऍड. वसुदेव वासे,विदर्भ कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कामडी, शिक्षक आघाडीचे विदर्भ अध्यक्ष प्रा. शाम अणे, वाहतूक आघाडीचे विदर्भ अध्यक्ष रमेश शेमेबेकर, विदर्भ सचिव रामदास माहुरे, डॉ. किशोर सुरडकर, नागपूर शहर महिला अध्यक्ष संध्याताई, शेट्टे अमरावती जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रमोद पाथुर्डे, वाशीम जिल्हा अध्यक्ष दिपक तिरके, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अमोल काकड, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष दिनेश भोंगाडे, उपाध्यक्ष नागोराव कोठारे, गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख मुखरोजी ओगेवर, भंडारा जिल्हा प्रभारी प्रेमकुमार महेशकर, स्वरूप रामटेके, गोंदिया जिल्हा प्रभारी राजन कुर्वे , नागपूर शहर उपाध्यक्ष डॉ. अरुण चुरड, मुख्य सचिव डॉ प्रशांत शिंगाडे ,सचिव देवीदास आगरकर,मनोज निनावे, विजय भालाधरे, सहसचिव सुनील शेंडे, कामगार आघाडीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष मनीष मेश्राम, नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मेश्राम, प्रमोद मडावी, प्रशांत कडबे, वाडी शहर प्रभारी ताराचंद मेंढे, हिंगणा युवा अध्यक्ष हेमराज ईरपाते, दवलामेटी अध्यक्ष विलास कडबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती विदर्भ सचिव रामदास माहुरे यांनी दिली.