अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केले राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश




वन बुथ १० युवक राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते तयार होणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची वाढ होणार नाही, ग्रामपंचायत पासून तर लोकसभा क्षेत्रापर्यंत आपला कार्यकर्ता तयार झाला पाहिजे,तेव्हा कुठे राष्ट्रीय समाजाला न्याय मिळेल असे वक्तव्य नागपूर येथील जवाहर वस्तीगृह सिव्हिल लाईन येथे राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित विदर्भ स्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात माजी मंत्री आमदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.महादेव जानकर बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.काशीनाथ (नाना) शेवते हे होते तर उद्घाटक मा.हरीकिशनदादा हटवार संघटक विदर्भ प्रदेश,स्वागताध्यक्ष ॲड रमेश पिसे अध्यक्ष रासप विदर्भ प्रदेश,तर प्रमुख अतिथी म्हणून मा.ज्ञानेश्वर (माऊली ) सलगर मुख्य महासचिव रासप,मा.गोपाल भारती, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संयुक्त मोर्चा,मा.संजय कन्नावार महासचिव रासप विदर्भ,मा.राजेद्र पाटील संपर्क प्रमुख रासप विदर्भ,माहुरे सचिव रासप विदर्भ हे होते.
या कार्यक्रमाच्या पहील्या सत्रात सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिराचे अध्यक्ष डॉ अनंत नास्नुरकर अध्यक्ष नागपूर शहर हे होते तर मा.प्रा.हरीष येरणे बहुजन विचारवंत,सुधिर सुर्वे हे होते तर दुसऱ्या सत्रात उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षस्थानी मा.राजेद्र पाटील विदर्भ संपर्क प्रमुख, राघवेंद्र महेद्रीकर हे होते. एक
राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.काशीनाथ शेवते यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवावी हे सर्व करतांना अंतर्गत हेवेदावे बाजूला सारून काम करावे,विदर्भ हा सत्तांतर घढविणारा आहे.त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष विदर्भात सत्तांतर घढविल्यशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले
यावेळी अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जानकर साहेबांवर विश्वास ठेवत राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला त्याचा मी ओबीसी बोलतोय या पुस्तकाने सन्मानित करुन पक्षप्रवेश घेण्यात आला .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय समाज पक्षातील विदर्भ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली