महादेव जानकरांनी दिले कार्यकर्त्यांना कानमंत्र






नागपूर हिवाळी अधिवेशन:- दोन वर्षांनंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन nagpur adhiveshan सुरु आहे. त्या दरम्यान काही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार माजी मंत्री मा.महादेव जानकर साहेब Mahadev jankar यांची भेट घेतली आणि जानकरांनी पदाधिकाऱ्यांना चांगले कानमंत्र देत पक्ष कसा वाढविता येईल याबद्दल माहिती दिली.


महादेव जानकर हे एका सर्वसामान्य कुटूबांतून आले आहेत.त्यांनी आजपर्यंत केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.घरातून निघाल्यानंतर मी लग्न करणार नाही प्रपंच वाढविणार नाही, अशी शपथ घेत घराबाहेर पडले ते फक्त राष्ट्रीय समाजासाठी.अनेक कार्यकर्त्यांना मंत्री,आमदार,जि.प. सदस्य,नगरसेवक बनविले आहे.मात्र त्यातील काही राहीले आणि काही पद मिळताच पक्षातून बाहेर पडले,त्यांचे स्वप्न आहे राष्ट्रीय समाज पक्ष फक्त खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक बनविण्याची फॅक्टरी बनविने,आणि राष्ट्रीय समाज वाढविणे हे ध्येय आहे, मी या भारताचा पंतप्रधान बनणार आणि ते मी करून दाखविणार या भाष्यावर अनेकांनी वेळ्यातही काढले,मात्र आज ते प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसत आहे.
आज विदर्भातील काही पदाधिकारी जानकर साहेबांना भेटण्यासाठी आले होते.आपल्या व्यस्त कार्यक्रमातही पदाधिकाऱ्यांना भेटण्याचे आव जानकर साहेबांना आवरता आले नाही.त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार Sanjay kannawar यांना त्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावण्यासाठी सांगितले ते उपस्थित ही झाले. चर्चे दरम्यान साहेबांनी अंदाजे एक ते दिड तास त्या पदाधिकाऱ्यांसोबत हितगुज केले आणि सर्वांना कानमंत्र देत पक्ष वाढीसाठी मदत करण्याचे आवाहन केले.त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष आता मोठ्या प्रमाणात विदर्भात वाढ करण्याचे आश्वासन दिले त्यामूळे राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गरुड झेप घेईल यात तिळमात्र शंका नाही.




 त्यांनी यावेळी सांगितले कि राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ स्तरीय कार्यकर्त्यां मेळावा दि.२१ डिसेंबर २०२२ रोजी जवाहर वस्तीगृह सिव्हिल लाईन नागपूर येथे होत आहे तरी सर्व पदाकारी कार्यकत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही केले.