▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलवून पुण्यश्लोक अहील्यादेवी नगर करा जानकरांची मागणीमहाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी विधीमंडळात हिवाळी अधिवेशना दरम्यान केली.
पुण्यश्लोक अहील्यादेवी यांचे जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात झाला त्यांनी जगभर केलेले कार्य सर्वश्रुत आहे.अश्या महान अनेक लोकापयोगी कार्य करणाऱ्या मातेचा सन्मान करण्यासाठी त्यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावी अशी आग्रही मागणी विधानपरीषदेच्या सभागृहात जानकर यांनी केली.
देश्यात भाजपाचे सरकार ,महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असतांना अहमदनगर जिल्ह्याचे नाव का बदलण्यात येत नाही.असा प्रश्न जानकर यांनी उपस्थित केला.
त्या प्रश्नावर उत्तरं देताना मंत्री मा.दिपक केसरकर यांनी ही मागणी जुनीच असून लवकरात लवकर माहीती गोळा करणे सुरू आहे.माहीती गोळा झाल्यानंतर केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.