माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल.अक्कीसागर यांना मातृशोक..बेळगाव (कर्नाटक) : वृत्तसंस्था
राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांच्या मातोश्री गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर
यांचे वृद्धापकाळाने मौजे चंदरगी जिल्हा बेळगाव येथे राहत्या घरी निधन झाले. गेल्या वर्षभरापासून गंगुबाई अक्कीसागर या वृद्धापकाळाने घरीच होत्या. नुकतीच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कर्नाटक दौऱ्यावेळी चंदरगी या गावी मुक्काम करून गंगुबाई अक्कीसागर यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. गंगुबाई अक्कीसागर या निरक्षर होत्या, परंतु त्यांनी सुपुत्र एस.एल अक्कीसागर यांना २२ वर्षी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर म्हणून धाडले होते. आईच्या वृद्धापकाळामुळे एस एल अक्कीसागर गावीच राहत होते. गंगुबाई अक्की सागर यांच्या पश्चात सात मुले व एक मुलगा, सून, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.