अन् जानकरांनी कंत्राटी विज कामगारांचे प्रश्न विधीमंडळात मांडले.



राज्यात अनेक कंत्राटी तत्वावर विज कामगार आहेत त्यांना कंत्राटदारामार्फत पगार देण्यात येते.गावात ते अविरत पुणे सेवा देत असतात तरी सुद्धा त्यांना अल्प प्रमाणात पगार दिला.कंत्राटदार आपला फायदा करून घेण्यासाठी कामगारांना अल्प प्रमाणात महीण्याचा पगार दिला जातो.त्यामुळे त्यांना त्यांच्या खात्यात सरळ शासनाच्या वतीने पगार देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर Mahadev jankar यांनी तारांकित प्रश्नात हा मुद्दा उपस्थित केला.
त्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने कामगार आणि शासन यांच्यात एक मदस्ती ठेऊन सरळ कंत्राटी विज कामगारांच्या खात्यात सरळ पगार देण्याची घोषणा केली. तसेच कुशल कामगारांना वेगळे मार्क देऊन त्यांची येणाऱ्या काळात भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे कंत्राटी विज कामगारांनी महादेव जानकर यांचे अभिनंदन केले.