मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन....दखल घ्या..... अन्यथा राज्यभर आंदोलन.. ... प्रा. ऍड. रमेश पिसे.चंद्रपूर:- दि.२२ नोव्हे.२२, महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढणे संदर्भातील न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार याचिका दाखल करणेबाबत मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे (eknath shinde)यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे आणि नागपूर शहर अध्यक्ष डॉ. अनंत नासनूरकर यांचे नेतृत्वात जिल्हधिकारी आणि तहसिलदार नागपूर यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
यांचे सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील एकूण २,२३,००० अतिक्रमणे काढण्यात यावीत असा उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला आहे . परंतु गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या धोरणानुसारच अनेक ग्रामपंचायतीने त्याच्या गायरान जमिनी ह्या जमिनी नसलेल्या गोर - गरिब जनतेला शासनाच्या विविध योजनेतून घरकुल बांधण्यासाठी दिलेल्या आहेत . याठिकाणी रस्ते , वीज , पाणी पुरवठा या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने अब्जावधी रुपये खर्च केले आहेत . तसेच अनेक कुटूंब बेघर होऊन समाजात असंतोष निर्माण होईल व समाजाचे प्रचंडआर्थिक नुकसान होणार आहे . त्यामुळे मुंबई (Mumbai) पुणे धर्तीवर गाव खेड्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियामित करण्यात यावे आणि पुन्हा पुढील काळात अतिक्रमण रोखण्यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी करणे उचित ठरेल .सदर निर्णय अन्यायकारक असून काही गायरान जमिनीवरती जिल्हा परिषदे शाळेच्या इमारती , शासकीय कार्यालय , प्राथमिक आरोग्य केंद्र , जनावरांचे दवाखाने हे शासनाची परवानगी घेऊनच बांधलेले आहेत .. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या हेतुने अतिक्रमण काढने संदर्भातील फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून सर्वसामान्य दिलासा द्यावा ,
अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने राज्यभर या प्रश्नासाठी जन आंदोलन छेडले जाईल या आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी राज्य शासन आणि प्रशासन जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी.
.यावेळी निवेदन देताना राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील,विदर्भ अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे, नागपूर शहराध्यक्ष डॉ. अनंत नासनूरकर,विदर्भ सचिव रामदास माहुरे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कामडी, डॉ. किशोर सुरडकर, नागपूर शहरमुख्य महासचिव डॉ. प्रशांत सिंगाडे, उपाध्यक्ष डॉ. अरुण चुरड,शहर सचिव देविदास आगरकर,सहसचिव सुनील शेंडे,शहर संघटक मनीष मेश्राम,नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मेश्राम, प्रशांत कडबे, आदी मान्यवर उपस्थित होते.अशी माहिती विदर्भ सचिव रामदास माहुरे यांनी दिली.