रेल्वे पुल अपघातातील निलीमाचे मरणोत्तर नेत्रदानचंद्रपूर येथील एकोरी वार्डात राहणाऱ्या भीमराव रंगारी यांची धम्म सहचारिणी नीलिमाचे काल दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ला बल्लारपूर ballarpur येथील रेल्वेvraiway पुलाच्या अपघातामध्ये दुःखद निधन झाले. नीलिमा या मागच्याच वर्षी एका अपघातामध्ये जखमी झाल्या होत्या. परंतु त्यातून बरी झाल्या होत्या. परंतु या वेळेस मात्र, काळाने बरोबर डाव साधला आणि आपल्या सगळ्यांपासून निलीमाला हिरावून नेले. परंतु या दुखाच्या प्रसंगी सुद्धा रंगारी rangariपरिवाराने सामाजिक भान राखून स्मृतीशेष निलिमाच्या इच्छेचा मान ठेवत शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथील नेत्रपेढीला निलीमाचे मरणोत्तर नेत्रदान केले. रंगारी परिवाराचा हा निर्णय स्तूत्य असुन समाजाला नक्कीच एक नवीन दिशा देणारा आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील रहीवाशी भगत कुटूंबीय आपल्या मुलीला पुणे येथे शिक्षणासाठी सोडण्यासाठी निघाले होते. बल्लारपूर निवासी आत्याची गळाभेट घेऊन रंगारी व भगत कुटूंबीय पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यासाठी बल्लारपूर रेल्वे स्थानकावर आले. पादचारी पुलावरून जात असताना एकाच वेळी पादचारी पुल कोसळल्याने सर्व जण खाली पडले. आणि यात मामी निलीमा भिमराव रंगारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भाचीला निरोप देताना ती जगाचा निरोप घेईल, असे कधी वाटले नव्हते. पण, तसेच घडले.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य
बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.
रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्र्यांनी ५ लाख रु.चे अर्थसहाय्य मृतकेच्‍या कुटूंबियांना जाहीर केले आहे.