चंद्रपूर (वि. प्रति . )
आजच्या आधुनिक युगात प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर उपलब्ध आहेत. आज सारं जगचं या ‘ऑनलॉईन’' च्या विळख्यात गुरफटत चाललं आहे. याचाचं फायदा काही गैरप्रवृत्तीच्या लोकांकडून घेण्यात येत असल्यामुळे आर्थिक फसवणुकीचे प्रकार होत आहे. सायबर गुन्ह्यात झालेली वाढ याचे प्रमाण आहे.
नुकतीचं अशा प्रकारे फसवणुकीचा एक प्रकार समोर आला आहे. नागपूर येथे मुख्य कार्यालय असलेली प्रविण मुडे संचालित मुडे स्टॅन्व्ही मार्केटिंग सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने आपले मायाजाल पसरविले आहे. या कंपनीकडून प्रवास, ऑनलाईन शॉपींग, हॉटेल बुकिंग, यामध्ये कुपन पद्धतीने विविध प्रलोभने देऊन ग्राहकांची लुबाडणुक करण्यात येत आहे. आपल्या कंपनीसाठी १५ हजार रूपये मासिक सॅलरी देण्याचे आमिष दाखवुन बेरोजगारांची नियुक्ती करण्यात येत आहे. कंपनीचा प्रसार-प्रचार व जास्तीत जास्त प्रमाणात होऊन ग्राहकांना जोडण्यासाठी कॉलेज परिसरातील कॅम्पस मध्ये सुशिक्षीत युवकांना पगाराचे आमिष दाखविल्या जात असुन एक-दोन महिने त्यांचेकडून ऑनलाईन पद्धतीने मार्केटिंग करून त्यांना जेंव्हा पगार देण्याची वेळ येते तेंव्हा मात्र त्यांना पारिश्रामिक दिले जात नाही. महत्वाचे म्हणजे “एक घर, एक रोजगार" हे या कंपनीचे ब्रिद आहे. पगाराचे आमिष दाखवुन बेरोजगारांकडून मोफत मध्ये काम करवून घ्यायचे आपल्या कंपनीसाठी ग्राहक जोडायचे व पारिश्रामिक देण्याची वेळ आली तर तुमच्या जे होते ते करा अशा धमक्या द्यायच्या असा प्रकार या कंपनीने चालविला आहे. नुकतेच चंद्रपूर येथे पाटील यांची टिम प्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आली. टिम प्रमुख या नात्याने यांनी कंपनीत कार्य करण्यासाठी मासिक पगार तत्वावर काही युवकांना जोडले. आता त्या सर्वांचे पारिश्रामिक देण्याची वेळ आली तेंव्हा टिम प्रमुख यांची मुंबई येथे येऊन तुम्ही आमचे काम सांभाळा, तेंव्हाचं तुमचे पारिश्रामिक दिले जाईल असे सांगीतले जात आहे. फसवणुक झालेल्या बेरोजगारांनी आपली व्यथा मांडतांना ही कंपनीचं बोगस असुन यांच्या पोर्टल मध्ये अनेक त्रुट्या असल्याचे सांगीतले. या कंपनीमध्ये सुशिक्षीतांनी जास्त जास्त प्रमाणात जुळविण्यासाठी कॉलेजच्या कॅम्पस् चा सहारा घेतला आहे.बेरोजगार युवकांनी कंपणीला पगाराबाबत विचारणा केली असता त्यांना मुंबई येथे आपली बदली करण्यात येत असून आपण त्वरीत मुंबई ऑफिस मध्ये रुजू होण्याचे आदेश त्यांच्या मेलवर पाठविण्यात आले आहे.त्यामुळे कंपणीच्या या बळजबरीला काही युवक कंटाळले आहे.
या गैरप्रकाराला त्वरित थांबविण्यात येवून सदर कंपनीची सायबर सेलच्या माध्यमातुन चौकशी करावी, अशी मागणी फसवणुक करणाऱ्या युवकांकडून करण्यात येत आहे.