चंद्रपूर :- जागतिक पातळीवर सुधिर मुनगंटीवार यांनी वनवैभव वाचविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे सर्वश्रुत आहेत.त्याच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे IUCN (international union conservation of nation) या आंतरराष्ट्रीय स्तरावर वन संपत्ती वर कार्य करणाऱ्या संघटनेने आज हरीत नेतृत्व सुधिर मुनगंटीवार यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार IUCN चे मुख्य अर्चना चटर्जी (नवी दिल्ली) व प्रा.सचिव वने महाराष्ट्र चे श्री वेनुगोपाल रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शैलेश टे़भुर्णीकर यांनी IUCN घ्या कार्याची माहिती दिली. जगामध्ये वाढलेले प्रदुषण व पर्यावरण रक्षणासाठी ही संस्था कार्यरत आहे. यावेळी मंचावर IUCN च्या प्रमुख अर्चना चॅटर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या. चंद्रपूर येथिल मूल रोड स्थित "वन अकादमी" येथे या कार्यक्रमाचे आज बुधवार दि. २३ रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक वनीकरण च्या सुनिता सिंग, वन अकादमी चे संचालक श्रीनिवास रेड्डी, मंचावर उपस्थित होते. सोबतचं मुख्य वनसंरक्षक,वनरक्षक, वनाधिकारी व विविध वन अधिकाऱ्यांची ३ दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून त्याचे रितसर उद्घाटन मा.ना.श्री.सुधिर मुनगंटीवार वने व सांस्कृतिक कार्यक्रम, मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. सामान्य जनतेला प्रत्येक वृक्षांची फायदे व औषधीस उपयोगी असल्याची माहिती क्युआर कोड तपासणी करण्यासाठी "चंद्रमा" या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रमा या अॅपद्वारे प्रत्येक वनवृक्षाचे महत्व व त्यांची उपयुक्तता यांची माहिती त्या वृक्षावर लावलेल्या क्युआर कोड द्वारे मिळणार आहे.
वनसंपदेचे आपणाकडून ऱ्हास होत चालले असून पर्यावरण बिघडत चालले आहे.याकडे गांभिर्याने दखल देऊन वृक्ष लागवड करून त्याचे जतन करणाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. सन २०३० पर्यंत दिड पटीने वृक्षलागवड करण्याचा संकल्प या ठिकाणावरून करावा अशी संकल्पना मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी केली. फॉरेस्ट लॅन्डस्केप रिस्टोरेशन या संकल्पनेतून या प्रकल्पाचा प्रारंभ आज चंद्रपूरातून पहिल्यांदाच होत असल्याचे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. "वन-जल-कल" ही संकल्पना या माध्यमातून राबविली जाणार आहे. वन आहे तर जल आहे, जल आहे तर मनुष्याचे भविष्य अबाधित आहे, त्यासाठी प्रत्येक माणसांनी वन वाचविणे वृक्ष लावणे व त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, त्यासाठी वनविभाग, त्यांचे अधिकारी प्रत्येकांच्या पाठिशी उभे राहणार आहे, अशी घोषणा करतांना एका कवितेद्वारे आपल्या प्रबोधनपर भाषणाचा शेवट केला.
"जगत में जब तुने जन्म लिया,
तो लकडी ने तेरा साथ दिया...
सुला दिया तुझे एक लकडी के झुले में
छुटा बचपन तो चारपाई मिली वो भी लकडी की...
कमाकर जब घर बनवाया वो भी लकडी की...
शादी रचाई तब सर पर तोरण लकडी का...
साठ बरस में कमर झुंकी तो हाथ में डंटा लकडी का...!
या जंगलाचे महत्व विशद करणाऱ्या उद्बोधन पर कवितेने वनमंत्री मुनगंटीवार यांनी जंगलाचे महत्व व्यक्त केले. आजपासून तिन दिवस वनविभागाची ही कार्यशाळा राहणार असून या कार्यशाळेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना विविध विषयांवर वरिष्ठांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
*-राजु बिट्टूरवार, संपादक, साप्ता. विदर्भ आठवडी, चंद्रपूर*