"इवलीशी पणती" हर्ष भुरे यांची कविता*इवलीशी पणती*


मुर्ती लहान पण
थोर तिची महती
उदाहरणा सज्ज
इवलीशी पणती

होई दिपज्वलन
शुभ कार्यात मान
अमंगल समयी
शांत राहते छान

इवलीशी पणती
खुदकन हसली
भय नाही कधीच
अंधारात रुसली

देवघरात स्थान
देवापाशी बसते
मिरा सारखं प्रेम
मनात लपवते

तुळशी पाशी लावू
अंधार पळवते
इवलीशी पणती
सर्व तिला कळते

दिपावली सणाला
पणतीची पंगत
आनंद तिला भारी
परिवारा संगत

रोज लावू पणती
करुन तिची पूजा
लख्ख प्रकाश देते
भेदभाव न दूजा

✍🏻हर्षा भुरे,भंडारा