गडचिरोली : जिल्ह्यातील आष्टी येथील रहीवाशी भगत कुटूंबीय आपल्या मुलीला पुणे येथे शिक्षणासाठी सोडण्यासाठी निघाले होते. बल्लारपूर निवासी आत्याची गळाभेट घेऊन रंगारी व भगत कुटूंबीय पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यासाठी बल्लारपूर रेल्वे ballarpur railway स्थानकावर आले. पादचारी पुलावरून जात असताना एकाच वेळी पादचारी पुल कोसळल्याने सर्व जण खाली पडले. आणि यात मामी निलीमा भिमराव रंगारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भाचीला निरोप देताना ती जगाचा निरोप घेईल, असे कधी वाटले नव्हते. पण, तसेच घडले.
दि.२७/११/२०२२ रोजी सुमारे ६.३० वाजे दरम्यान साप्ताहिक असलेली काजीपेठ पुणे kajipet puneया रेल्वेने कु.निधि (छकूली) हीला पुणे येथे शिक्षणासाठी भगत व रंगारी कुटूंबीय जात होते.मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर पादचारी पुलावरील पत्रे निघून गेल्याने तो कोसळला. यात रंजना अशोक खडतळ वय५५,प्रिया अशोक खडतळ वय २२,अनुराग अशोक खडतळ वय ३०, निलीमा भिमराव रंगारी वय ४८, छाया मनोज भगत ४५, निधी मनोज भगत वय २१, चैतन्य मनोज भगत वय १८, अंजली विजय शर्मा वय २१, हे सर्वजण खाली कोसळले. त्यात काहींना रेल्वे लाईन च्या २५०० मेवाॅप्रवाहाचा स्पर्श झाल्याने काही जण भाजल्या गेलेत.
निधी झाली अपंगांची शिकार !
पुणेला शिक्षण घेत असलेली निधी (छकूली) रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अंपगत्वाची बळी ठरली. या दुर्घटनेत तिच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने निधी ही घटनेची शिकार ठरली.
निधीचे वडील आष्टी चे माजी सरपंच
आपल्या मुलीला सोडण्यासाठी गेलेले मनोज भगत हे गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील रहीवासी असून ते आष्टी ग्राम पंचायत चे माजी सरपंच आहेत. कुटूबांचा गाडा हाकलण्यासाठी ते बिल्टमध्ये काम करतात.
रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार
बल्लारपूर रेल्वे ballarpur railway स्टेशन वरील हे पादचारी पूल गेल्या १५-२० वर्षापुर्वी बांधण्यात आले. त्या पत्र्यांची डागडुजी करण्यात आली नाही. बल्लारपूर रेल्वे स्टेशन वर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने माणुसकीच हरवले! रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीसांनी बघ्याची भुमिका घेतली असल्याचे मत नातेवाईकांनी बोलून दाखवली. यावेळी बल्लारपूर पोलीसांनी मात्र तात्काळ मदत पुरवली. त्यामुळे बल्लारपूर पोलीसांचे आभारही नातेवाईकांनी मानले.
न्युरोसर्जननी केले हात वरती
दुर्घटना झाल्यानंतर गंभिर स्वरुपातील जखमींना बल्लारपूर येथीलच एका खाजगी डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी त्यां जखमी तपासणी करण्यास नकार दिला. माझ्याकडे अधिकृत परवाना नसल्याचे सांगत चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला देत न्युरोसर्जननी neurosurgenआपले वरती केले.
सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवली तप्तरता
घटनेची माहिती मिळताच सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळी दाखल होत मदत पुरवली. मुनगंटीवार यांची तत्परता बघून नातेवाईकही गहीवरले नातेवाईकांनी आभारही व्यक्त केले.
ही बातमी कळताच राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी त्वरित दखल घेत त् सर्व जखमींना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी collector श्री विनयकुमार गौड़ा तथा पोलिस अधिक्षक police श्री परदेशी यांना दिले आहेत. अपघातानंतर लगेचच भाजपाचे बल्लारपूर येथील पदाधिकारी रेल्वे स्टेशनवर पोहचून त्यांनी जखमींना ताबडतोब मदत केली. या प्रकरणी शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.