▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

पळसगाव (जाट) येथिल सार्वजनिक शौचालय अतिक्रमणाच्या विळख्यात  सिंदेवाही:- मुल नागपूर महामार्गावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट येथील बसस्थानक समोरील रहदारीच्या ठिकाणी असलेले सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायत पदाधिकारांच्या उदासीनतेमुळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहे.
        बसस्थानक समोर असलेल्या वेल्डींग व्यावसायिकांनी सार्वजनिक शौचालयाच्या सभोवताल अतिक्रमण करून सामान अस्ताव्यस्त टाकलेला आहे. त्यामुळे नागरिकांना शौचालयात जाण्यास अडथळे निर्माण होत आहे. समोर सामान इतका पडलेला असतो की तिथे जाताच येत नाही. ग्रामपंचायतचे पदाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित आहेत.
     बसस्थानकावर असलेले एकमेव शौचालय अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असल्याने नागरिकांना लघुशंकेसाठी इतरत्र जावं लागत आहे.त्यामुळे अतीक्रमीत केलेले अतिक्रमण हटवून नागरिकांची शौचालयाची सोय करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.