जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे गुरूद्वारा व चर्च मध्ये प्रबोधनाचे कार्यक्रमचंद्रपूर :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंन्द्रपुर तर्फे अनुक्रमे श्री.गुरुद्वारा व संत आंद्रिया चर्च येथे वरिष्ठ नागरीक कायदा व महिला/मुलांचे कायदेशीर अधिकार या विषयाबाबत प्रबोधन व जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्री. गुरुद्वारा मध्ये झालेल्या कार्यक्रमात कमेटिचे सचिव श्री. चमकौर सिंग, श्री. गिल , ईतर पदाधिकारी व बहुसंख्येने नागरीक ऊपस्थीत होते.
याशिवाय संत आंद्रिया चर्च मध्ये झालेल्या कार्यक्रमात आदरनिय पास्टर श्री. ऐन्थोनी सर, कमेटिचे सचिव श्री. निर्णय शिरवार, ईतर पदाधिकारी व बहुसंख्येने नागरीक ऊपस्थीत होते.
सदरील प्रसंगी प्राधिकरणाचे सचिव व दिवानी न्यायाधिश श्री.सुमीत जो‌शी साहेब व अँड.महेन्द्र असरेट यांनी संबधीत कायद्याचे विस्तृत मार्गदर्शन केले.