दिल्ली येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या धरणे आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार


चंद्रपूर दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय समाज पक्षा तर्फे मा. महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर संपूर्ण देश पातळीवरील ओ.बी.सी. समाज एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे.या धरणे आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांनी केले आहे.खालील प्रमुख मागण्या या धरणे आंदोलनात करण्यात येणार आहे.
1) जातनिहाय जनगणना करणे
2) ओबीसी आरक्षण कायम करणे
3) नॉन क्रिमिलिअर ची अट रद्द करणे
4) 4 ) 50% सिलींग हटविणे
5) सार्वजनिक संस्थामध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे


6) न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थामध्ये संपुर्ण आरक्षण लागू करणे
7 ) धान्यमालाला हमीभावाने खरेदीची हमी देणे
8) महागाई थांबविण्यासाठी ठोस पाऊले उचलणे
9) संपुर्ण शिक्षण मोफत करणे
10) मोफत आरोग्य सुविधा पुरविणे
वरील मागण्या मान्य करून घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांनी केले आहे.