आगामी निवडणूकीच्या पूर्व तयारीसाठी चंद्रपूर जिल्हा मनसेच्या वतीने शासकीय विश्रामगृहात आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक सुरू होती.या आढावा बैठकीत मनसेचे सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. आढावा बैठक सुरू असतानाच मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचा अर्तगत वाद चव्हाट्यावर आल्याने वादाला तोंड फुटले.वाद विकोपाला जाण्याचे लक्षणे दिसू लागताच जिल्हाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या हाणामारीत एका पदाधिकाऱ्यांचे कपडे सुध्दा फाडण्यात आले. काही महिन्यांपूर्वी मनसेचे पदाधिकारी एकमेकांविरोधात पत्रकार परिषद घेतली होती.त्याच विषयाचे शल्य मनात बाळगून हा वाद झाल्याची चर्चा सुरू आहे.या घटनेमुळे मनसैनिकात एकच खळबळ उडाली होती.काही पदाधिकारी वाद झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहाबाहेर जाऊन जे काही झाले ते चुकीचे झाले असे म्हणत बाहेरचा रस्ता धरला.मनसेच्या या वादाने चर्चैला चांगलेच फेव फुटले आहे.