चंद्रपूर जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेची कार्यकारिणी गठितचंद्रपूर जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचा संघ मर्यादित चंद्रपूरची आज दिनांक 16/06/2022 रोज बुधवार ला संघाच्या कार्यालयात संघाची पाचवी निवडणूक वर्ग 1 जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे निवडणूक अधिकारी श्री नंदनवार साहेब तसेच संघाच्या सर्व संचालकाच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत सर्वानुमते संघाचे अध्यक्ष म्हणून श्री चिंतामण नामदेवराव नागपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून श्री सचिन वामनराव कोतपल्‍लीवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत संघाचे सर्व संचालक श्री मारुती ठाकरे ,श्री सुरेश पानपट्टे श्री राजेंद्र वाघाडे, श्री मकसूद खान ,श्री प्रकाश वानखेडे श्री ओम प्रकाश रामटेके, श्रीमती अनिता डाखरे, श्री रविंद्र बाबुळकर, श्री सुरेश डहारे ,श्री सचिन फुलझेले उपस्थित होते.