सोलापूरात आज रासपचा मेळावा,



 राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आ. महादेव जानकर महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायत राज समितीच्या तीन दिवसांच्या शासकीय दौ-यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आल्याची माहिती राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांनी दिली. यानिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दिनांक १७ जून रोजी दुपारी २ वाजता शांतीसागर मंगल कार्यालय सोलापूर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला आ महादेव जानकर मार्गदर्शन करणार आहेत. रासपचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा रत्नाकर काका गुट्टे , प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते , मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, सरचिटणीस आबा मोटे प. महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने,उपाध्यक्ष सुनिल बंडगर, युवक अध्यक्ष अजित पाटील, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पंकज देवकते यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
          आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका होणार आहेत तसेच ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी पक्षाच्या वतीने आगामी पावसाळी अधिवेशनात संसदेवर निघणाऱ्या मोर्चाच्या नियोजना संदर्भात आ. जानकर साहेब कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 
        या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अध्यक्ष रणजित सूळ, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीमंत हक्के, शहर अध्यक्ष सतीश बुजरूके यांच्याकडे देण्यात आले आहे, तरी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजर रहावे असे आवाहन राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांनी केले आहे.