अलीकडे राजकारणाची परिभाषा संपूर्णपणे बदललेली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच गेली दोन वर्षे वैश्विक महामारी korona कोरोना संकटाने थैमान घातले. यात विकास कामे रेंगाळली मात्र राज्यातील जनतेच्या प्राण्यांचे रक्षण करताना संपूर्ण लोक प्रतिनिधी व frontline फ्रन्टलाइन वर्कर यांनी अहोरात्र मेहनत घेतली. अशा गंभीर परिस्थितीतही विरोधकांनी सत्ता पिपासू पणा न सोडता सरकार पाडणे हेतू विविध षडयंत्त्रिक प्रयत्न चालविणे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरुवातीपासूनच सर्वकाही आलबेल असून जनाशीर्वादाचा भरोशावर आता विकास कामांमध्ये सरकार आगेकूच करीत आहे. हे बघणे विरोधकांना बोचत असल्याने विरोधकांनी धर्मांध पणाचे नवीन सोंग उभारून जातीय तेढ निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला आहे. जनतेने अशा देवतांच्या नावावर अराजकता माजविणाऱ्या धर्मांधांना थारा न देता विकास संकल्पना राबविणाऱ्या सरकारच्या पाठीशी खंबीर उभे राहा असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. ते सिंदेवाही येथील विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रघुनाथ जी शेंडे, बाबुराव गेडाम, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, pwd विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, उपअभियंता माधव गावडे , काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ बारेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे शहराध्यक्ष सुनील उट्टलवार ,नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, उपाध्यक्ष मयुर सुचक, अरुण कोलते, माजी उपसभापती वीरेंद्र जयस्वाल, सीमा सहारे तसेच नगरपंचायतीचे सर्व विभागाचे सभापती व नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात कोरोना महामारी नंतर सर्वत्र विकासात्मक दृष्टिकोनातून राज्य सरकार पाहून उचलत असताना विरोधकांनी नाहक आगपाखड करीत भोंग्यांचा वाद निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न चालवला आहे. तर दुसरीकडे आमदार खासदार असलेल्या जोडपे नाहीतर चक्क मुख्यमंत्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निरर्थक वाद घालून कुरापती सुरू केल्या आहे. अशा देवी-देवतांच्या नावांवर दंगाधोपा करू पाहणाऱ्यांना खुद्द प्रभू श्रीराम व प्रभू श्री हनुमान दृष्ट दंड देतील अशी खोचक टीका नामदार वडेट्टीवार यांनी याप्रसंगी केली. यानंतर शिंदेवाही शहर व तालुका परिसरातील एकूण 23 दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल चे वितरण करण्यात आले. तद्वतच सिंदेवाही शहरातून जाणार्या प्रमुख महामार्गाचे काँक्रीटीकरण, शुद्ध पेयजल लय योजना, शहरातील तलाव सौंदर्यीकरण, मुख्य शिवाजी चौकाचे सौंदर्यीकरण, अशा विविध 233 . 76 कोटी विकास कामांचा माहिती नामदार वडेट्टीवार यांनी दिली. संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सिंदेवाही शहराच्या विकासाबाबत पंचक्रोशीत चर्चा केली जाईल अशीही ग्वाही यावेळेस पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली. जाती-पती व धर्मांध लोकांच्या नादात गुरफटून न जाता विकासाची संकल्पना राबवून यांना खंबीरपणे साथ द्या असे आवाहन यावेळी नामदार वडेट्टीवार यांनी केले. यानंतर आयोजित सुगम संगीत आर्केस्ट्रा कार्यक्रमांचा सिंदेवाही व तालुका वासियांनी हजारोंच्या संख्येने आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक युनूस शेख, प्रास्ताविक नगराध्यक्ष स्वप्नील कावळे तर आभार उपनगराध्यक्ष मयुर सुचक यांनी मानले.