राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दुग्ध विकास मंत्री मा. महादेव जानकर साहेब यांनी २२ मे २०२२ रोजी दुधाला ५० रू दर देण्याची मागणी करताच तात्काळ दुधाला ऊसाप्रमाणे एफआरपी देण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्याचा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने २३ मे २०२२ रोजी काढला. यासंदर्भातील पहिली बैठक २५ जून २०१९ रोजी मा. महादेव जानकर साहेब दुग्ध विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. परंतु पुढे महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले आणि दूधाच्या दरात प्रचंड घसरण झाली, त्याविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पांडुरंगाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून दुधाला ३५ रू. भाव मिळाला पाहिजे यासाठी राज्यभर फार मोठे आंदोलन केले.आणी सगळे पक्ष कोरोणाच्या काळात घरात बसले आसताना राष्ट्रीय समाज पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहून सरकारच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरला आणि राज्य सरकारला दूधाच्या दरात वाढ करायला भाग पाडले. आज राष्ट्रनायक मा महादेव जानकर साहेब यांच्या मागणी नंतर पुन्हा एकदा दूध दराचा विषय मार्गी लावण्यासाठी एक पाऊल या सरकारला पुढे टाकायला लावल्याबद्दल राष्ट्रनायक मा महादेव जानकर साहेब यांचे हार्दिक आभार नागरीकांनी केली आहे.