ओबीसींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाशिवाय पर्याय नाहीसध्या महाराष्ट्रात चालले सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्षांचे किळसवाणे राजकारण पहाता, ओबीसींच्या अनेक प्रश्नावर कुनाचेही लक्ष नांही आणि गांभीर्य ही नाही .एकमेकावर चिखलफेक करण्यातच मग्न आसल्याचे दिसून येते. यापुढे ओबीसींच्या प्रश्नांची सोडवणूक करुन घ्यावयाची आसेल, ओबीसींना आपले भविष्य उज्वल बणवायचे आसेल तर मा. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षा शिवाय आता पर्याय नाही. ओबीसी बांधवांनी इतर राजकिय पक्षाच्या मागे न लागता, सर्वांनी मिळून मा. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षा ला मदत करुन सध्या किमान महाराष्ट्रात तरी सत्तेवर बसविणे अत्यंत गरजेचे आहे असे माधवराव वजरगेकर यांनी स्वतः चे मत मांडले आहे.
सध्याच्या परिस्थितीत सत्तेवर आसलेले काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि विरोधी बाकावर आसलेला भाजपा या चारही राजकीय पक्षांनी ओबीसी च्या प्रश्नाबाबत नेहमीच टोलवा टोलवी करीत आलेले आहेत आणि यापुढे ही करतील तेव्हा आता ओबीसी नी आपला वेळ वाया न घालवता, सारासार विचार करुन, महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला तन, मन, धनाने मदत करुन शक्यतो लवकर सत्तेवर बसण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे.असे माधवराव वझरगेकर, नांदेड यांनी म्हटले आहे