शेकडो युवकांचा युवासेनेत शिवबंधन बांधून प्रवेश



शिवसेना प्रणित युवासेना सरचिटणीस अमोल दादा कीर्तिकर ,युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब,युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा कदम, चंद्रपूर लोकसभेचे युवासेना विस्तारक नित्यानंद जी त्रिपाठी यांच्या आदेशानुसार व पूर्व विदर्भ विभागीय सचिव हर्षल दादा काकडे,यांनी युवासेना yuvasena विधानसभा निहाय बैठक दौऱ्यावर आले असताना यांच्या मुख्य उपस्थितीत व मार्गदर्शनात तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे यांच्या नेतृत्वात तथा विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम यांच्या समन्वयाने शेकडो युवकांनी शिवबंधन बांधुन प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे,विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम ग्रामपंचायत सदस्य संजोग अडबाले,विशाल कावणे,अक्षय मेश्राम, स्वप्नील गजभिये, रिचर्ड रॉडरिक्स,मार्शल अडकीने, रोहित बार,अनिश सरकार,हर्ष कुकरे यांची उपस्थिती होती

युवासेना पूर्व विभागीय सचिव हर्षल काकडे

शिवसेना प्रणित युवसेने द्वारे गाव तिथं शाखा घर तिथं युवासैनिक शाखा गठीत करून पक्षात युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश करून पक्ष संघटन वाढून येणाऱ्या आगामी सिनेट,जिल्हापरिषद,महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढून विजय प्रस्तापित करू असे प्रतिपादन यावेळी केला.