परभणी जिल्ह्यातील लोडशेडींग बंद करण्याची रासपची मागणी



राज्यात उष्णतेचा पारा वाढत चाललेला असतांनाच राज्यात विजवितरणाने सहा तास लोडशेडींग चालु केली आहे.त्याच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने परभणी लोकसभा अध्यक्ष अखील अन्सारी यांनी लोडशेडींग बंद करण्याची मागणी केली आहे.
सध्या उष्णतेचा पारा वाढत चाललेला असून यातच मुस्लिम समाजाचा पवित्र रमजानईद सर्वत्र सुरू आहे.महात्मा जोतिबा फुले जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मात्र राज्यात व परभणी जिल्ह्यात सहा तासांचे लोडशेडींग लावल्या गेली आहे.त्यामुळे अश्या उत्सवाच्या वेळी लोडशेडींग मुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने महावितरण अधीक्षक अभियंता परभणी यांना लोडशेडींग बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.