म.रा.पुरोगामी महिला मंचची नवीन कार्यकारिणी जाहीर


 
    महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चंद्रपूरच्या भद्रावती येथील त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनापूर्वी झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत महिला मंचाच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली . चंद्रपूर जिल्ह्यातील १५ ही तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार यांच्यासह जिल्हासरचिटणीस म्हणून संजय चिडे , जिल्हाकार्याध्यक्ष म्हणून गंगाधर बोढे , जिल्हाकोष्याध्यक्ष सुनील कोहपरे , जिल्हानेता नारायण कांबळे , जिल्हासल्लागार दीपक वऱ्हेकर यांची एकमताने निवड करण्यात आली . 
              पुरोगामी समितीच्या लोकशाही कार्यपद्धतीत स्त्री पुरुष समानता असल्याने समांतर महिला मंच अग्रस्थानी हक्कासाठी लढा देत असते . महिला शिक्षकातील नेतृत्व म्हणून महिला मंचाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून विद्या खटी , जिल्हासरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे , जिल्हाकार्याध्यक्ष सिंधू गोवर्धन , जिल्हाकोष्याध्यक्ष लता मडावी , जिल्हानेता सुनीता इटनकर , प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांची एकमताने निवड करण्यात आली . 
          नियामक आढावा सभेचे निरीक्षक म्हणून राज्यसरचिटणीस हरीश ससनकर  , राज्य महिला अध्यक्ष अल्का ठाकरे तर मार्गदर्शक म्हणून राज्यनेते विजय भोगेकर उपस्थित होते . नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्व १५ ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच भद्रावती येथील त्रैवार्षिक अधिवेशनात नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार करून गौरविण्यात आले