गायत्री शेंडे यांच्या ‘ऋणानुबंध’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन



राजुरा (प्रतिनिधी).
‌झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर(ग्रामीण) शाखा राजुरा च्या वतीने कवयित्री सौ. गायत्री प्रकाश शेंडे यांच्या ऋणानुबंध काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजुरा येथे झाले. ओम साईराम सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . न.प.राजुराचे माजी उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले तर प्रमुख अतिथी म्हणून झाडी बोली साहित्य मंडळाचे जिल्हा प्रमुख कवी अरूण झगडकर , न.प.च्या माजी शिक्षण सभापती वज्रमाला बतकमवार ,प्रा. डाॕ.हेमचंद दुधगवळी , सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ पथाडे , भाष्यकार म्हणून कवी भाविक सुखदेवे ब्रम्हपुरी तसेच कवी तेजस गायकवाड (सोलापूर ) , कवयित्री प्रा. रत्नमाला भोयर ( मुल), शाखाध्यक्ष अॕड.सारिका जेनेकर लाभले होते. 
     या काव्यसंग्रहाचे विमोचन मान्यवरांचे हस्ते झाल्यानंतर कवयित्री च्या आईवडीलांचा सत्कार करण्यात आला. 


 ‌झाडीबोली साहित्य चळवळीने अनेक नवोदितांना लिहिते करून त्यांना साहित्यिक अशी ओळख निर्माण करून दिली. भाषेला समृद्ध करायचे असेल तर बोलीचे संवर्धन होणे गरजेचे  असल्याचे मत अरूण झगडकर यांनी व्यक्त केले.  भाष्यकार भाविक सुखदेवे यांनी गायत्री शेंडे यांचा हा  कवितासंग्रह  नात्यातील संबंधाची सांगड घालणारा आहे ,असे मत मांडले तर तेजस गायकवाड यांनी साहित्यातून समाजमन जागृत करण्याची इच्छाशक्ती निश्चितच कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.कवयित्री गायत्री शेंडे यांनी आपल्या मनोगतातून साहित्य निर्मितीचा प्रवास विषद केला. याप्रसंगी उद्घाटक सुनील देशपांडे  यांनी कवयित्री सौ.शेंडे यांच्या  साहित्य निर्मितीचे आणि शैक्षणिक कार्याचे  भरभरून कौतुक केले. 
       दुसऱ्या भागात कवयित्री प्रा.‌रत्नमाला भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अॕड.सारिका जेनेकर व कवी डाॕ.किशोर कवठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कविसंमेलनात लक्ष्मण खोब्रागडे,प्रशांत भंडारे, वृंदा पगडपल्लीवार, जयंती वनकर,अनिल आंबटकर,सुनील बावणे,अर्जुमनबानो शेख,मंजुषा दरवरे,प्रा.प्रशांत खैरे,योगेश धोडरे,नंदकिशोर मसराम,उपेंद्र रोहणकर,प्रा.विनायक धानोरकर,संजीव बोरकर,दिलीप पाटील,डाॕ.अर्चना जुनघरे,सविता कोट्टी, प्रीती जगझाप,सरीता गव्हारे,सविता मालेकर आदींनी कविता सादर केल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा पेंदोर आणि संगिता बांबोडे यांनी केले तर आभार  प्रदर्शन ताटवाकार संतोष मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाडीबोली साहित्य मंडळाच्या अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.