केंद्र सरकारने एसी ट्रेन चे दर कमी केल्याने आभार - देवेंद्र फडणवीस
मुंबई / चंद्रपूर :- केंद्र सरकारने आज एसी ट्रेन चे दर कमी करण्याचा घेतलेला निर्णय मुंबईकरांसाठी हा अतिशय मोठा आणि महत्वाचा निर्णय आहे.

मुंबईकरांसाठी एसी ट्रेन तर सुरू झाली होती मात्र त्याचे दर जास्त होते अस लोकांकडून एैकले होते त्यामुळे लोकांना परवडण्यासारखे नव्हते परंतु आता केंद्र सरकारने मुख्यतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे, अश्विनी वैष्णव यांनी लोकांची मागणी लक्षात घेऊन ट्रेन चे दर 50 टक्क्यांनी कमी करून मुंबईकरांना दिलासा दिला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार.