युवतीचा नग्नावस्थेत धडावेगळे मृतदेह आढळलाभद्रावती तेलवासा रस्त्यालगत असलेल्या सरकारी आयटीआयसमोरील शेत शिवारात अंदाजे 27 वर्षीय एका अनोळखी युवतीचा शिरच्छेद केलेला नग्नावस्थेतील धडावेगळे मृतदेह आढळून आला.

हा मृतदेह पोलिसांना शिरच्छेद करून बेवारस फेकून दिल्याचे दिसून आले. मृतदेह नग्नावस्थेत आणि मुंडके नसलेल्या अवस्थेत होता. आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटलेली नाही. शीर शोधून काढण्यासाठी चंद्रपूर पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून तपासाच्या सुचना दिल्या. परिसरातील शेतशिवारात शीर शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने सदर युवतीसोबत अत्याचार करून क्रुरपणे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भद्रावती येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.