चंद्रपुर तालुक्यातील ताडाली साखरवाही येथील सेवा सहकारी संस्थेचे निवडणुका जाहीर झाल्या होत्या. दिनांक १४ मार्च २०२२ पर्यत नामनिर्देशन भरण्याची अंतीम तारीख होती. चोखारे गटाकडून १३ उमेदवाराचे अर्ज दाखल करण्यात आले. परंतु १३ व्यतिरिक्त कोणत्याही उमेदवारचे अर्ज आले नसल्यामुळे ताडाली व साखरवाही सोसायटीवर, दिनेश चोखारे, हेमराज दिवसे, सुधीर दिवसे, नामदेव जुनघरे, नथुजी उगे, शालिक चिकराम, तुळसाबाई कासवटे, गोपिका चोखारे, मुरलीधर चौधरी, बाबा जुनघरे, संतोष झाडे, सुरेश धांडे, विजय दिवसे, साखारवाही सोसायटीवर नीरज बोंडे, सुनील पाचभाई, विलास भगत, विठ्ठल वासाडे, रामचंद्र निब्रड, कवडू शेरकी, रमेश नांदे, मनोज वाढई, चंद्रशेखर काकडे, जगन्नाथ वानखेडे, भरत तानकर, बाबूजी शेख, ज्योती काकडे यांची अविरोध निवड झाली असून सोबतच कोठारी सेवा सहकारी सोसायटी वेडली सोसायटीवर सुद्धा या गटाचे वर्चस्व राहिले आहे.
येरूर येथील सेवा सोसायटीवर विजय बलकी याचे मार्गदर्शनात 17 उमेदवारी फॉर्म भरले होते. चार उमेदवारानी अर्ज मागे घेतले.त्यामुळे 13 फॉर्म राहिल्याने येरूर येथील सेवा सोसायटी निवडणूक अविरोध झाली आहे , त्यात विजय बलकी, सुरेश घोरुडे, रमाकांत बलकी, अमोल वैद्य,गुलाब वैद्य , सुनील भोयर, देवानंद आवळे,मारोती बरडे, विमल गौरकार, सुनीता देरकर, भारत निखाडे, विठ्ठल वडस्कर,नरेंद्र जोगी यांची अविरोध निवड झाली आहे, सोसायटी अविरोध साठी संपूर्ण गावातील येरूर वासीयांनी मदत केली अविरोध उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत आहे