▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

आज चंद्रपूर येथे राष्ट्रिय समाज पक्षाचा आढावा बैठक,सत्कार सोहळाचंद्रपूर:- राष्ट्रिय समाज पक्षाचे राज्यभर पक्ष प्रवेश कार्य जोमात सुरू असून चंद्रपूर येथे दि.७मार्च २०२२ रोजी महसुल भवन पाण्याच्या टाकीज जवळ नागपूर रोड चंद्रपूर येथे सायंकाळी पाच वाजता आढावा बैठक,सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष मा. काशीनाथ (नाना) शेवते व महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर पक्षाचे मार्गदर्शक मा.गोवींदराम शुरनार हे येत असून यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार असून यात अनेकांचा पक्ष प्रवेशही होणार आहे.या आढावा बैठकित जिल्ह्यात होऊ  घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूके व नुकताच ओबीसी आरक्षणा बदल दिलेल्या कोर्टाच्या निकालावर विचार विनिमय करण्यात येणार आहे.तसेच जिल्ह्यातील रासपचे विविध नवीन पद नियुक्त्या यावेळी  प्रदेशाध्यक्ष मा.श्री.काशिनाथ शेवते करणार आहेत.
तरी सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाकाऱ्यांनी केले आहे.