वर्षांमागून वर्ष उलटले; तरी खेडी गोंडपिपरी धाबा रोड होईना त्यासाठी २८ मार्चपासून कामबंद आंदोलनखेडी गोंडपिपरी धाबा या मार्गाचे कंत्राट एस आर के कंपनीला 2019 मध्ये देण्यात आले. आततागायत आजपर्यंत रोडच्या कामाला गती देण्यात आली नाही. याबाबत अनेक निवेदने आंदोलने करण्यात आली आहे. मात्र, मुजोर कंपनी व मुजोर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.या विरोधात २८ मार्चपासून कामबंद आंदोलन करण्यात आले.


डिसेंबर महिन्यापासून खेडीपासून रोडचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. मात्र काम संथगतीने, निकृष्ट दर्जाचे व दर्जाहीन रोड बांधकाम होत असल्याने राष्ट्रीय समाज पक्ष, ऑटो चालक मालक संघटना ता. मुल,व त्रस्त नागरीकांचा जुनासुर्ला येथे दि.२८ मार्च २०२२रोजी सकाळी ११वाजतापासून कंपनीचे काम बंद करण्यात येणार आहे.
खेडी गोंडपिपरी धाबा रोडचे जुने रोड खोदून त्यावरील डांबर बाजुला करणे, त्यात गिट्टी,मुरुम टाकून मजबूत करणे आहे. मात्र कंत्राटदार स्वःताच्या फायदयासाठी फक्त जुन्याच रोडला तोडून त्याच डांबरावर नविन डांबर टाकत त्यामुळे हा रोड निकृष्ट दर्जाचा व दर्जाहीन बनत आहे.खड्डे युक्त रस्ता असल्याने याच रोडवर मुल पंचायत समिती सदस्य संजय भाऊ मारकवार व करंजी येथील बालकांचा मृत्यू झाला तर अनेक अनेकांना अपंगत्व आल्याने कुटुंबावर आघात झाला आहे.
जूनासुरला येथील एका बाजूचे रोडचे काम सुरू करण्यात आले असून अवघ्या तीन दिवसात रोड फुटला रोड मध्ये खूप भगदाड पडले आहे. त्यामुळे आपले पितळ उघडे पडू नये म्हणून त्या फुटलेल्या रोडचे दुसऱ्यांदा काम करण्यासाठी खोदकाम सुरू केली आहे. त्यामुळे अशा मुजोर कंपनीला वठणीवर आणण्यासाठी जन आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे.कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. कुठलेही ठोस काम न करता देयके उचलल्याने कचाटदारावर व संबंधित दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. सदर कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. सदर कामाचे रक्कम उचल त्यांच्याकडून व्याजासह रक्कम परत करून घ्यावे व त्यांच्याकडून काम काढून घ्यावा या मागणीसाठी दिनांक २८ मार्च २०२२ पासून टप्प्याटप्प्याने कंपनीचे बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.