जुनासुर्ला हे गाव विदर्भात अनोळखी होती. मात्र साहीत्य संमेलन आयोजित केल्याने आज जुनासुर्लाने विदर्भ जिंकला आहे. या गावाची ओळख खुप प्राचीन आहे. झाडीबोली भाषेचा गोडवा खुप मोठा आहे. त्याच पध्दतीने कडवाही आहे. माणसे ही भाषेनी जोडली जातात. झाडीपट्टीतील बोली भाषेतील लवचिकता जपण्याचे काम आजच्या झाडीबोली साहीत्य मंडळ जपत आहे. येथील नवनिर्वाचित वाचनालयाला ३० लाखांचा निधी देणार आहे, जिर्ण झालेल्या ग्राम पंचायतीच्या इमारतीसाठी २५ लाखांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा झाडीबोली साहीत्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मा.नाम.श्री. विजय वडेट्टीवार यांनी केली
मुल तालुक्यातील जुनासुर्ला येती झाडीबोली साहीत्य मंडळ साकोली व स्याका जुनासुर्ला च्या वतीने २९वा झाडीबोली साहीत्य संमेलनाचे उद्घाटन मा.ना.श्री.विजय वडेट्टीवार (मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा पालकमंत्री चंद्रपूर) यांच्या हस्ते पार पडले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ मनोहर नरांजे हे होते तर प्रमुख पाहुणे मा. डॉ हेमकृष्ण कापगते माजी आमदार,मा. संतोष सिंह रावत अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मा. डाॅ श्रीराम कावडे, रत्नमाला ताई भोयर, घनश्याम येनूरकर, राकेश रत्नावार,राजू मारकवार,विजय कोरेवार, आशाताई देशमुख,सारीका भुमलवार व अनेक मान्यवर उपस्थित होते.
या साहीत्य संमेलनात विविध साहीत्याने लेखनीय असलेला साप्ताहिक चंद्रपूर क्रांती विशेषांकांचे मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.