जुनासुर्ला येती उद्या सनवार १२अना इतवार १३मार्च २०२२ ला मुल तालुक्यातील जुनासुर्ला येती झाडीबोली साहीत्य मंडळ साकोली व स्याका जुनासुर्ला च्या वतीने २९वा झाडीबोली साहीत्य संमेलन दि. १२ अन् १३मार्च रोजी होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ मनोहर नरांजे हे राहणार असून संमेलनाचे उद्घाटक मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा पालकमंत्री चंद्रपूर हे राहणार आहेत.या संमेलनाचे खास पावनं मा. डॉ हेमकृष्ण कापगते माजी आमदार,मा. संतोष सिंह रावत अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मा.डाॅ श्रीराम कावडे, घनश्याम येनूरकर, संदीप कारमवार,राकेश रत्नावार,विनोद अहीरकर,अखिल गांगरेड्डीवार,राजू मारकवार व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवशीय संमेलनात एकूण नव टप्पे होणार असून यात पुस्तक प्रकाशन,बायांचे गाणे, लोकजागृती कार्यक्रम,झाडीपट्टीची दंडार,झाडी कवि संमेलन आदी कार्यक्रम सादर होणार आहेत.यात मा.ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर,मा.ना.गो.थुटे, डॉ.राजन जयस्वाल, डॉ इसादास भडके, डॉ.परशुराम खुणे, ॲंड.लखनसिंह कटरे,मा.हिरामण लांजे,हिरालाल पेंटर, जितेंद्र लेनगुरे,मा.उध्दव नारनवरे,मा डॉ विजय चिटमलवार, डॉ.सुरेश पेशट्टीवार,प्रा.श्रावण बानासुरे,संजय कन्नावार,मा.गणपती वडपल्लीवार,मा.सौ.अंजनाबाई खुणे, डॉ.सुदर्शन दिवसे, डॉ अचल मेश्राम आदींची या टप्प्यात उपस्थीती राहणार आहे.
तर संमेलनाचा समारोप मा.आ.श्री. सुधिर भाऊ मुनगंटीवार माजी मंत्री तथा अध्यक्ष लोकलेखा समिती विधिमंडळ मुंबई,मा. संध्याताई गुरनुले अध्यक्ष जिल्हा परिषद,चंदु मारगोनवार,शीतलताई बांबोळे,रत्नमाला ताई भोयर,अमोल चुदरी, डॉ.बळवंत भोयर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या साहीत्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन झाडीबोली साहीत्य मंडळाचे अध्यक्ष डॉ हरीचंद्र बोरकर,स्वागताध्यक्ष रंजीत समर्थ,कार्याध्यक्ष गणेश खोब्रागडे,सहकार्याध्यक्ष खुशाल टेकाम,सचिव राम महाजन, डॉ गुरूदास पाखमोडे, केंद्रीय समन्वयक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर,शाखाध्यक्ष लक्ष्मण खोब्रागडे व जुनासुर्ला वासीयांनी केले आहे.