ताडाळी ग्रामपंचायतीत ५०लाखाची कामे वर्क ऑर्डर विनाच सुरूताडाळी ग्रामपंचायत अंतर्गत पक्के बांधलेल्या सिमेंट रोडवर नळ जोडणी करीता विना कार्यारंभ पत्राने (वर्क ऑर्डर) रोडची तोडफोड केल्याने सरपंच,सदस्य व ग्रामसेवक, कंत्राटदार अडचणीत येण्याची शक्यता आहे.इतकेच नाही तर जवळपास ५०लाखाची कामे कार्यारंभ (वर्क ऑर्डर)पत्राविनाच नियमबाह्य सुरू आहे. हे सर्व कामे नियम धाब्यावर बसवून केले जात असल्याने यावर कार्यवाहीचा बडगा उगारणार कोण?याबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.
यापूर्वी ग्रामपंचायत ताडाळीच्या १८/३/२०२१च्या मासीक सभेत १५व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी सामान्य फंडात उसनवार घेण्याचा ठराव शासन निर्णयाचा विसंगत असल्याचे सचिवाने याची जाणीव करून दिल्यानंतरही सर्वानुमते पारीत केला. तसा ठराव पारीत करून नियमबाह्य ठरावाला मंजुरी दिल्या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी दोषी ठरविले,याबाबत जि.प.सिईओच्या आदेशाने ताडाळी ग्रामपंचायतीत खळबळ अश्या आशयाचे वृत्त साप्ताहिक चंद्रपूर क्रांती च्या न्युज पोर्टल वर २७/११/२०२१ रोजी प्रकाशित करण्यात आली होती.मात्र चौकशी अजूनही थंडबस्त्यात आहे.

ताडाळी ग्रामपंचायत अंतर्गत १५व्या वित्त आयोगातून घरगुती नळ जोडणी, रस्ते बांधकाम व कामाकरीता ग्राम पंचायतने अनुमती दिली आहे.या करीता ग्राम पंचायतला ५०लाखाचा निधी सुध्दा प्राप्त झाला आहे.या कामांकरिता निविदाही काढण्यात आले.या कामाचे अजून कुणालाही कंत्राट मिळाले नाही.मात्र निवीदा ओपन होण्यापूर्वीच एका कंत्राटदाराने या कामाची सुरुवात केली आहे.याबाबत ग्रामपंचायत सचिव पिंपळशेडे यांना विचारणा केली असता.त्यांनी याबाबत आम्हाला काहीच माहीत नसल्याचे सांगितले.
सदर कामासाठी सिमेंट क्रांक्रीटीकरण केलेल्या मजबूत रोडला नालीच्या बाजुने पुर्णतः तोडून ठेवले आहे.सदर कामाचे कंत्राट कुणाला मिळाले नसतांना सुध्दा या कामाला सुरुवात करण्यात आले असल्याने या क्षेत्रात तर्कवितर्क लावण्यात जात आहे.