मंत्री आदित्य ठाकरे यांनी मच्छीमार संघटनेला डावलले


महानगरातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रामाळा तलावाचे व किल्ल्याचे निरीक्षण करण्यासाठी पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आज माता महाकाली नगरीत प्रथम आगमन होत आहे.परंतु गेल्या 65 वर्षापासून रामाळा तलावाचे सुशोभिकरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्यांना डावलण्यात आल्याने आदित्य ठाकरे साहेब मच्छीमार बांधवांची भेट घ्या.अशी विनंती प्रसिद्धी पत्रकातून वाल्मिकी मछुआ सहकारी संस्थेचे संचालक बंडू हजारे,पांडुरंग गावतुरे व संतोष झा यांनी केली आहे.
1957 पासून वाल्मिकी मछुआ सहकारी संस्थेला महाराष्ट्र शासनाने मासेमारी करण्याचा अधिकार दिलेला आहे.रामाळा तलावाला अतिक्रमणापासून वाचविणे, साफसफाई करणे तसेच देवी व गणपती चे सांगाडे गेल्या 65वर्षांपासून संस्थेचे सभासद शासनाची कोणतीही मदत न घेता करित आहे. आजपर्यंत रामाळा तलावाचा विकास असो,किल्ल्याची समस्या इतर कोणत्याही घटना घडल्यास जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन यांनी कधीही वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेला गृहीत धरल्याशिवाय कोणतेही कार्यक्रम राबवित नाही.
गणपती-देवी विसर्जन,कोणी आत्महत्या केल्यास प्रेत काढणे, मेलेल्या जनावराचे शव काढणे,इकोर्निया सारखी घातक वनस्पती, निर्माल्य काढून फेकणे असे अनेक कार्य मच्छीमार बांधव करतात.पर्यावरणाला घातक प्रक्रिये पासून बचाव करण्याचे कार्य संस्थेचे शेकडो सभासद करित आहे.तरी मच्छीमार बांधवांना डावलण्यात आले आहे,अशी खंत प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त करण्यात आली आहे.

मच्छीमार बांधवांकडे दुर्लक्ष नको
संस्थेचे 300/सभासद असून त्यांच्या कुंटूंबाचा उदरनिर्वाह रामाळा तलावाच्या मासेमारीवर अवलंबून आहे. कोरोना काळापासून तलावाचे खोली करण्यासाठी पाणी सोडल्याने सभासदाच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेचे सभासद दिवस रात्र रामाळा तलावाला वाचविण्यासाठी अथक परिश्रम करित आहेत. जिल्हा प्रशासनाने वाल्मीकी मच्छमार सहकारी संस्था मर्या, चंद्रपूर या संस्थेला निमंत्रण न दिल्याने भविष्यात तेथील मच्छीमार बांधवावर प्रशासनाचे दुर्लक्ष होऊन त्याच्यावर उपासमारीची येईल अशी शक्यता पत्रकात व्यक्त करण्यात आहे. अन्याय होऊ नये म्हणून मंत्री महोदयानीं रामाळा तलावाचे रक्षण करणाऱ्या समाज बांधवांना भेट देवून त्याची समस्या सोडवावी,अशी मागणी प्रसिद्दीपत्रकातून करण्यात आली आहे.