रासपच्या वतीने जुनासुर्ला येथे शिवजयंती निमित्त आरोग्य तपासणी शिबिररयतेचा राजा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे आयोजित करण्यात आली आहे.या आरोग्य शिबीराचे आयोजक संयोजक संजय कन्नावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहे. याशिबीराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती चंदुजी मारगोनवार यांचे हस्ते तर सह उद्घाटक रणजीत समर्थ सरपंच जुनासुर्ला हे राहणार आहेत. मार्गदर्शक विजयजी कोरेवार सभापती प.स. सावली, डॉ तुषार जी मर्लावार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली हे लाभणार आहेत. या तपासणी शिबीराला प्रमुख पाहुणे म्हणून संजय येनुरकर, खुशाल टेकाम उपसरपंच जुनासुर्ला,गणेश खोब्रागडे अध्यक्ष विविध सहकारी कार्यकारी सोसायटी जुनासुर्ला, शुक्राचार्य मद्रीवार, राजू गोवर्धन सदस्य,शंकर पाटेवार, संदीप गिरडकर,सुक्राचार्य मद्रीवार,मल्लाजी इदुलवार,जानुजी मिडपल्लीवार,बोन्ताबाई कन्नावार माजी सरपंच,श्वेताताई रामेवार माजी सरपंच,सौ.आशाताई देशमुख पोलिस पाटील,सौ.सारीका भुमलवार सदस्य ग्रा.प.जुनासुर्ला हे राहणार आहेत.तरी या आरोग्य तपासणी शिबीराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांव्दारे करण्यात आली आहे.