सिंदेवाही काँग्रेसतर्फे मोदींच्या महाराष्ट्र विरोधी वक्तव्या निषेधार्थ धरणे
सिंदेवाही - प्रतिनिधी
आगामी काळात होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश राज्यच्या निवडणुकी प्रचारात तसेच संसदेत महाराष्ट्र राज्यात कोरोना  पसरविण्यामागे काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचे बेजबाबदार वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी तथा सर्व काँग्रेस पक्षीय कार्यकर्त्यांनी स्थानिक शिवाजी चौक येथे शर्म करो मोदी अशा घोषणा देत निषेध आंदोलन करीत धरणे दिले.


महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन इतर मागास कल्याण, खार जमिनी विकास तथा चंद्रपूर जिल्हा पालक मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार आज स्थानिक शिवाजी चौक येथे करण्यात आलेल्या निषेध आंदोलना प्रसंगी सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपसभापती बापुरावजी गेडाम,महिला काँग्रेस अध्यक्ष सीमाताई सहारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरेंद्र जयस्वाल, अरुण कोलते, नगरसेवक स्वप्नील कावळे, युवक अध्यक्ष तथा नगरसेवक मयुर सुचक, नगरसेवक दिलीप रामटेके, भास्कर ननावरे , श्याम छत्र वाणी,पंकज ननावरे,अशोक जी तुम्मे सचिन नाडमवार, संजय गव्हाणे, विनोद लोणकर,उज्वला निकोडे, विद्या वाढई, वैशाली पुणपरेड्डीवार, माजी नगराध्यक्षा अशा गंडाते, जयश्री नागपुरे, नगरसेवक पूजा रामटेके, वैशाली पुपरेड्डीवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष रमाकांत लोधी म्हणाले की देशातील जनतेने संविधानातील मता अधिकाराच्या हक्काने पंतप्रधानांची निवड केली असून पंतप्रधान या पदावरून एका विशिष्ट पक्षाची बाजू घेऊन विरोधी पक्षाचा ला खालच्या पातळीवर बोलून निरर्थक आरोपांचा भडीमार करणे अशोभनीय कृत्य असून पर राज्यातील मजूर कोरोना काळात अडकली असताना त्यांची उपासमार होऊ नये व त्यांच्या जीविताची काळजी घेऊन महाराष्ट्र सरकारने केलेल्या समाजसेवी कार्याला गालबोट लावून राजकीय पोळी शिकण्याचा हा हेतू असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तर अध्यक्षीय भाषणात बाबुरावजी गेडाम यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेले वक्तव्य हे अतिशय चुकीचे असून पंतप्रधान देशाचे की विशिष्ट पक्षाचे असा सवाल यावेळी उपस्थित केला. तसेच शहर अध्यक्ष सुनील उट्टलवार यांनी  महाराष्ट्रावर निषेध करताना मोदी यांनी पदाची भान ठेवावे व ाज्यातून 18 भाजपचे खासदार निवडून देणार्‍या महाराष्ट्राला केवळ विरोधी नजरेने पाहणे हे धोरण मोदी सरकारचे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर विविध नेत्यांनी या प्रसंगी आपले मत प्रदर्शित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक युनूस शेख प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे तर आभार स्वप्नील कावळे यांनी मानले.