वनविभागात प्रशिक्षित शार्प शूटरच नसल्याची धक्कादायक माहिती



चंद्रपूर जिल्हा हा वनवैभवाने नटलेला आहे.चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे जगविख्यात आहे. विवीध प्रकारचे वन्यप्राण्यांचा समावेश आहे. जिल्हाभरात दररोज एकनाएक वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची बातमी हमखास असते. वनविभाग मात्र जनतेची तोंडे बंद करण्यासाठी लवकरच आम्ही उपाययोजना करू असे आश्वासन देऊन मोकळे होतात. मात्र वन्यप्राण्यांचा हल्ला चालुच असतो. त्या वन्यप्राण्यांचा हल्ल्यापासून जनतेला संरक्षण देण्यासाठी प्रशिक्षीत श्युटरची व प्रशीक्षीत rappid reasfons unit रॅफीड रिसन्फान्स युनिटची (अती शिघ्र दल) आवश्यकता असते. मात्र चंद्रपूर वनविभागाकडे प्रशिक्षीत श्युटर व प्रशिक्षित युनिट नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


चंद्रपूर वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सिटीपीएसमध्ये आपल्या आई सोबत फिरत असतांना ऑगष्ट २०२०रोजी एका निष्पाप ५ वर्षीय मुलीचा वाघाच्या हल्ल्यात जिव गेला. वनविभाग व सिटीपीएसने जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र त्या नरभक्षक वाघांना पकडण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरले. या घटनेचा धसका घेत Ctps सिटीपीएसने झुडपे तोडून आत जाण्यासाठी सुटसुटीत रस्तेही बनविले. मात्र वन्यप्राण्यांचा हल्ला थांबता थांबेना. इतकेच नव्हे तर राणी हिराई विश्रामगृहात समोर एका पट्टेदार वाघाने पकडले होते. आरडाओरडा करीत कसाबसा वाघाच्या जबड्यातून बचावला त्याला गंभीर दुखापतही झाली.


मात्र वनविभाग कुंभकर्णाच्या झोपेतच!

दि.१६/२/२०२२ रोजी रात्री १०.३० वाजता सुमारास पुन्हा एकदा वाघाने हल्ला करून ठार केला. वनविभागाने आणि सिटीपीएसने रोख रक्कम देऊन आपली कर्तव्ये पार पाडली. निष्पापाचा जिव गेला परीवारावर शोककळा पसरली. वनविभागाने नेहमी प्रमाणे आपली गस्त वाढविली दुरून दुरून अभिमानही सुरू केले. मात्र विभागाला कुठेच वाघाचा थांग पत्ता लागला नाही. इतकेच नाहीतर काल दि.१७/२/२०२२ला पुन्हा राज भडके या युवकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. अजुनपर्यत त्या युवकाचे शव मिळाले नाही. वनविभागाकडे प्रशिक्षीत श्युटर असते तर कदाचित वाघाला जेरबंद करता आला असता व अनेक निष्पापाचे जिव वाचले असते. सिटीपीएसच्या अवती भवती चार ते पाच वाघाचे अस्तित्व असल्याचे बोलले जात आहे. त्या वाघांना पकडण्याच्या परवानगी साठी मुख्य सचिव वनविभाग यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे कळते. वाघाना जेरबंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांचे अन्यत्याग आंदोलन सुरू असून जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत अन्यत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचे भटारकर यांनी सांगितले आहे.