पुन्हा बिबट्याने केले युवकाला ठार
चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर नेरी येथील युवकाला बिबट्याने ग्रामपंचायत च्या मागील भागातून उचलून नेले असून त्यालाही ठार केल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात राज भडके रा. दुर्गापूर नेरी, वय १६ वर्षे असे त्या युवकाचे नाव आहे.काल सिटीपीएसमध्ये कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या इसमाचा वाघाने हल्ला करून ठार केले होते.त्याचे शव छिन्नविछीन्न अवस्थेत मिळाले होते.पुन्हा एक दिवस उलटत नाही तोच याच परीसरात पुन्हा बिबट्याने युवकाला ठार केल्याची घटना घडली आहे. राज मडके याांना काल रात्री  दुर्गापूर ग्रामपंचायत मागील भागातून बिबट्याने उचलून नेले आहे.या घटनांमुळे शहरात दहशत निर्माण झाले आहे. अजुनपर्यंत त्या युवकाचे शव मिळाले नसून शोध कार्य सुरू आहे.

थोड्याच वेळात वाचा वनविभागातील प्रशिक्षीत श्युटर बाबत