गडचिरोली:- नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भामरागड तालुक्यात 17 आदिवासी तरुणांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी श्री. मोहनदास खोब्रागडे कमांडंट 37 बटालियन यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसीय शिबिर सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा उद्देश आदिवासी तरुणांना रोजगारक्षम बनवणे आहे. उल्लेखनीय आहे की याआधीही 37 बटालियन CRPF दरवर्षी भामरागड तहसीलमध्ये विविध प्रकारचे नागरी कृती कार्यक्रम व प्रशिक्षण शिबिरे राबवून नागरिकांना रोजगारासाठी प्रशिक्षित करत आहे. नक्षलवादात युवक बाधित क्षेत्राचा नक्षलवादापासून भ्रम निरास होईल व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. या प्रशिक्षण शिबिराचे सर्व नागरिकांनी मुक्त वाणीने कौतुक केले व भविष्यातही असे लोकोपयोगी उपक्रम सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. श्री नितीश कुमार, सहायक कमांडंट , इन्स्पेक्टर/जिडी परमिंदर सिंग, भामरागड पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री. किरण लस्कर, पोलीस आणि CRPF चे सर्व कर्मचारी या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.