लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे....साजरा झाला माजी मुख्यमंत्री शरदचन्द्र पवार यांचा वाढदिवसमुल:-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेबाच्या दिनांक वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून रामलीला भवन मूल येथे लाईव्ह थेट प्रक्षेपण led व्दारे करण्यात आले.लाईव्ह प्रक्षेपणादरम्यान अनेक national congress चे दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन व पक्षातील नवनवीन उपक्रम उपस्थितितांना दाखविण्यात आले !
कार्यक्रमापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके , बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ , जेष्ठ नेते महादेवराव पिदूरकर , डाँ. अडबाले ह्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलण चा कार्यक्रम करण्यात आला !
यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्य केक सुद्धा कापण्यात आला !
सदर कार्यक्रमात वाढदिवसाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत अनेकांनी पक्ष प्रवेश सुद्धा केला !
यावेळी भाग्यश्रीताई तागडे, युनूस शेख , फारूख शेख, शानु खान, शानु शेख , पवन गुरनुले, अश्विन खोब्रागडे, वैभव चिताडे,सोहन न्हाने , ह्यांच्या सह अनेकांनी आपआपल्या कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला !
कार्यक्रम अतिशय शांत पद्धधतीने पार पडला!कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतेने करण्यात आली! या कार्यक्रमाचे आयोजन बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ यांनी केले !
सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष किसनराव वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, महिला तालुकाध्यक्ष निताताई गेडाम, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे ,युवक तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार, हेमंत सुपणार, प्रभाकर धोटे, विपुल ठिकरे, अजय त्रिपट्टीवार, साईनाथ गुंडोजवार, संदीप तेलंग, धम्मपाल घडसे, मारोती रोहिने, नितेश म्याकलवार, इंद्रापाल पुणेकर, सुमीत लाकडे ह्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता कथक परिश्रम केले !