कोरोनाचे नियम डावलल्याने मिना बाजार संचालकावर ५०हजाराचा दंड



महानगरपालिकेच्या चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजीत करण्यात आलेल्या मिना बाजारावर कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याचे कारणांमुळे महानगरपालिकेने ५०हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे माहीती मिळाली आहे.
कोरोनाचा वाढत्या प्रकोपाला आढा घालण्यासाठी शासन स्तरावरून विविध योजना राबविण्यात येत आहे. मात्र काही व्यावसायिक कोरोनाच्या नियमांचे पालन न करता नियम पायदळी तुडवण्याचे काम करीत आहे.अश्या व्यावसायिकांना अद्दल घडविण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे.कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या संचालकांवर कार्यवाही करण्यात आली.


नुकताच दक्षीण आफ्रिकेत कोरोनाजन्यomycon ओमायकाॅन नावाच्या नव्या विषाणुचा जन्म झाला असल्याने जगभरामध्य त्याची दहशत निर्माण झाली आहे.भारतातही त्याचा शिरवाक होऊ नये यासाठी भारतातील राज्यांनी खडक निर्बंध घातले आहे.जिल्हाधिकारी मार्फत नव्या विषाणुचा धोका टाळण्यासाठी नविन नियमावली लागू केलेली आहे.चंद्रपुरातही महानगरपालिकेने यांचा धसका घेतला आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीतील चांदा क्लब ग्राऊंडवर काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या मिना बाजारावर कोरोना नियमांचे पालन न केल्याच्या कारणावरून संचालकांवर ५०हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.