चंद्रपूर:- दिवाळीच्या पुर्वसंध्येपासुन गडचिरोली जिल्ह्यात आसरा घेत असलेल्या त्या गजराजांच्या कळपांनी आता चंद्रपूर जिल्ह्यात आगमन केली आहे. मागील काही महिन्यांपासून ओडीसा राज्यातून आलेल्या गजराजांच्या कळपाने गडचिरोली- चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून अनेकांना नुकसानीचा फटका बसला आहे.त्यामुळे गडचिरोली जिल्हा पाठोपाठ आता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी करांची झोप उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वन्य हत्तीच्या कळपाने प्रवेश केला होता.गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात या हत्तींचा कळप दिसून आला होता. त्यानंतर ते हत्ती मालेवाडा मार्गे वडसा वनविभाकडे कुच केली होती.त्यानतर दोन-तीन दिवसा- आगोदर पंधरा ते विसच्या संख्येने असलेल्या हत्तीचा कळप देसाईगंज ( वडसा) तालुक्यातील उसेगाव कोंडाळा परिसरात आढळून आला. हत्तींचा कळप लागूनच असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा निश्चित करणाऱ्या वैनगंगा नदी पात्र करीत ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव खरकाडा निलज शेतशिवारात आज दि.8 डिसेंबर ला रात्रौ 8 ते 9 वाजताच्या सुमारास दाखल झाला असून हत्तीला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे. वन कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना पांगविण्यात येत आहे तर हत्तींच्या हालचालीकडे ब्रह्मपुरी वन विभागातील अधिकारी वन कर्मचारी ग्रस्त देत आहेत . पिंपळगाव खरकडा निलज परिसरात हत्तींचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे . नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
मागील काही महिन्यांपासून ओडीसा राज्यातून आलेल्या हत्त्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला असून अनेकांना नुकसानीचा फटका बसला आहे.गडचिरोली जिल्ह्यात नागरीकांचे घरे व शेतातील धानाचे पुंजने व शेतमाल उद्ध्वस्त केल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यात पदार्पण केले आहे.हत्तीच्या हौदोसामुळे परीसरातील नागरीक भयभीत झाले असून रात्रभर गस्त घालावे लागत आहे.या हत्तीना हाकलून लावण्यासाठी वनविभागाचे विशेष प्रयत्न सुरू असून अजूनही वनविभागाचे गस्त सुरू आहे.हत्तींच्या धुमाकुळामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता परीसरात केली जात आहे