मागील २०दिवसापासुन विज निर्मिती केंद्राच्या आवारात बिजीआर कंपनीच्या विरोधात साखळी व आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.त्याच्या मागण्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय मानवाधिकार संगठण, नवी दिल्ली चे महाराष्ट्र उपाध्यक्ष विवेक बारसिंगे आणि महाराष्ट्र महासचिव नीलेश हिवराळे यांनी स्मॉल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन च्या साखळी उपोषण मंडपाला भेट दिली.
चंद्रपूर महऔष्णिक विद्युत केंद्राच्या १००० मेगावॅट विस्तारित प्रकल्पात कंत्राटी स्वरूपात काम केलेल्या अनेक लहान मोठ्या कंत्राटदारांचे पैसे बि. जी. आर. या कंपनीने कारण नसतानाही रोखून ठेवले.
सन २०१४ पासून काम केलेल्या या कंत्राटदाराचे अजूनही जवळपास ६ कोटी रुपयांहून अधिकची रक्कम बी.जी.आर. या कंपनीने रोखून ठेवली.
कंत्राटी काम केलेल्या या लहान मोठ्या कंत्राटदारांनी आपले कामाचे पैसे मिळावे म्हणून अनेकदा बि.जी. आर. या कंपनीच्या चेन्नई येथील मुख्य कार्यालयाला सुद्धा प्रत्यक्ष भेट दिली.
तसेच महाजनको च्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा प्रत्यक्ष भेट देत अनेकदा पत्रव्यवहार केले. परंतु अजूनही त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित मुख्य कंत्राटी कंपनी बि. जी. आर. च्या निषेधार्थ स्मॉल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नाईलाजास्तव उपोषणाला सुरुवात केली.
बि.जी.आर. या कंपनीने महाजनको कडून पैशाची उचल केल्यानंतरही या लहान मोठ्या कंत्राटदाराचे पैसे दिले नाही व आता जोपर्यंत कंपनी या कंत्राटदारांचे हक्काचे पैसे देणार नाही, तोपर्यंत या उपोषणातून माघार घेणार नाही अशी भूमिका स्मॉल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज व्यक्त केली.
त्याच्या या साखळी उपोषणाला केंद्रीय मानवाधिकार संगठण , नवी दिल्ली यांचा उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.