रक्तदुताने वाढदिवस साजरा केला अनाथालयात!चंद्रपूर : भटाळी गावातील सामाजिक कार्यकर्ते आरोग्य मित्र व रक्तदूत असे परिसरात नावाजलेले सचिन उपरे यांनी दि. 12/12/2021 कोणताही अवाजवी खर्च न करता नेहमी प्रमाणे आपला वाढदिवस अनाथालयात जाऊन शालेय जीवनात आवश्यक नोटबुक व पेन्सिल देऊन साजरा करण्यात आला. दरवर्षी विविध प्रकारचे वाढदिवसाचे विशेष आयोजन करून वाढदिवस साजरा केला जातो.त्यात आरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबिराचे गावा-गावात आयोजन करून लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे तसेच गरजू लोकांना मदत करणे हे सर्व कार्य सतत चालू असतात. यावर्षी सुध्दा सचिन उपरे यांनी सामाजिक दायित्व जपत आपला वाढदिवस आशियाना अनाथालय मध्ये साजरा केला. यावेळी अनाथालयातील सर्व मुले अनाथालयाच्या संचालिका अल्काताई उपस्थित होत्या. यात विशेष सहकार्य अतुल येरगुडे ,प्रवीण उपरे ,आशिष उपरे ,विकास पेंद्राम, सोनू आगाशे, गौरव तेलंग निखिल सातपुते यांचे लाभले.