मा.शरद पवार दि.१८ व १९ नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावरचंद्रपूर (वि.प्र.) देश्याचे नेते माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष मा.श्री.शरदचंद्र पवार यांचा दि.१८ व १९ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी सांगितले आहे,
गुरुवार दि.१८ नोव्हेंबरला "तालुका क्रीडा संकुल मुल" येथे आयोजित "शेतकरी,कामगार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण कार्यकर्त्यांचा विभागीय भव्य मेळावा" दू.३ वा.होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी सर्व सहकाऱ्यासह उपस्थित राहावे आणि चंद्रपूर येथे शुक्रवार दि.१९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वा.जनता महाविद्यालय, प्रांगणात चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(ग्रा.)च्या कार्यकारिणी बैठकीस आद.श्री.शरदचंद्र पवार साहेब उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी ही माहिती दिलीआहे.